राजूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या


1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

प्रतिनिधी - ललित मुतडक, राजूर.

      

राजूर पोलिसांनी गेल्या 15 दिवसांपासून अवैध व्यवसायांवर कार्यवाहीचा बडगा उगारला आहे.राजूर येथे अवैध व्यावसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे साहेब यांनी मुसक्या आवळल्या आहेत.राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री 9 वाजता कोल्हार घोटी रस्त्याने  अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनासह वाहनातील  नोज भीमा गवारी (वय 25) यास राजूर पोलिस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी कारवाई करत वाहन व दारू असे एक लाख तीस हजार 240 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.     राजूर परिसरात एक मारुती सुझुकी 800 या कंपनीची गाडी अवैध दारू वाहतूक करणार असल्याची माहिती सपोनि नरेंद्र साबळे यांना मिळाली.त्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी यांनी आय टी आय कॉलेज समोर,कोल्हार घोटी रस्ता राजूर येथे नाकाबंदी केली.त्यावेळी मारुती सुझुकी 800 या कंपनीची गाडी नंबर एम.एच.03 झेड 620 हे वाहन दिसून येताच त्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहना मध्ये दारू असलेल्या तीस हजार 240  रुपये किमतींची बॉबी संत्रा कंपणीच्या  504  सीलबंद बाटल्या (प्रत्येकावर  180 मिली /60 रुपये  किंमत असलेल्या) व 1 लाख रुपये किमतींचे वाहन असा मुद्देमाल   मिळून 1 लाख तीस हजार 240 रुपये किमतींचा मुद्देमाल मिळून आला.


अवैध व्यासाय करणारे,दारू विक्री,वाहतूक करणारे,ठिकाणे याबाबत माहिती असल्यास राजूर पोलीस स्टेशनला कळवावी,त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आव्हान स.पो.नि.नरेंद्र साबळे यांनी केले आहे.

       वाहतूक करणाऱ्या वाहनातील इसमाकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव  मनोज भीमा गवारी वय 25 रा.सर्वोदय, राजूर असे नाव सांगून नमूद मुद्देमाल विना परवाना विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.त्या चालकास वाहनासह ताब्यात घेऊन राजूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नंबर 123/ 2021   मु पो ऍक्ट कलम 65 (अ )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भैलुमे  करीत आहे. सदरची कारवाई सपोनि नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  कॉन्स्टेबल भैलुमे,अशोक गाडे, फटांगरे ,पांडूरंग  पटेकर  यांनी केली.

  

820 views0 comments