सरसगट मिळणारी खावटी योजना आता फक्त दहा वीस लोकांना मिळते

आदिवासी नागरिकांनी वैभवभाऊ पिचड यांच्यासमोर मांडल्या व्यथा अकोले ;- अकोले तालुका आदिवासी असूनही खावटी वाटप बिगर आदिवासी भागात चालू असून पूर्वी सरसगट मिळणारी खावटी ठराविक दहा वीस घरांना मिळणार अशी व्यथा माजी आमदार वैभवराव पिचड यांचे समोर भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावातील नागरिक मांडत होते.


मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रद, घाटघर, पांजरे, मुरशेत, शेंडी या गावांना माजी आमदार यांनी भेटी दिल्या यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, आदिवासी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे, जयराम इदे, भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, कृषी अधिकारी कोष्टी, विस्तार अधिकारी धांडे, वीज वितरण चे भोईर, सुरेश गभाले, सुनील सरोक्ते, पांडुरंग खाडे, तुकाराम खाडे, डॉ अंतू वारुळे, सचिन पवार, नरेंद्र नवले, गोकुळ वाघ, विशाल डगळे आदी उपस्थित होते.

मधुकरराव पिचड यांच्या कार्यकाळात कोणतीही योजना प्रथम आदिवासी अकोले तालुक्यापासून सुरू होयची. पण आता उलट झालं असून योजना आमच्या पर्यंत पोहचत नाही. त्या योजना दुसऱ्या तालुक्यात सुरू आहे असं कळत असे मत नागरिक व्यक्त करीत होते.

खावटी मिळाली नाही, फक्त मोदींनी दिलेले रेशन मोफत मिळाले आहे. त्यामुळे जीवन जगत असून पर्यटन बंद आहे. पिके पावसाळा लांबविले मुळे लागवड लाभली असून खते उपलब्ध नाही त्यामुळे लागवड होऊनही पिके येतील की नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करीत होते. लवकर खते उपलब्ध करून घ्या अशी मागणी शेतकरी करत होते.

आदिवासी भागात वीज, पाणी, मोबाईल रेंज यांचा खूप समस्या आहेत. आश्रम शाळाच्या वर्ग खोल्याना गळती असून सरकारने इमारत दुरुस्ती साठी निधी दिला असून प्रकल्प कार्यालय परवानगी देत नाही त्यामुळे विद्यार्थीना वर्गात बसण्याची अडचण निर्माण होणार आहे.

आमच्या भागातली एस टी बंद असून आम्ही प्रवास कसा करायचा असेही लोक सवाल करीत होते. बस सुरू झाली पाहिजे. अशी मागणी करीत होते.


191 views0 comments