खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या पोलिसांनी 10 महिन्यांनी आवळल्या मुसक्या

अकोले - गेल्या 10 महिन्यांपासून फरार असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या अकोले पोलिसांनी आवळल्या आहेत.मयूर सुभाष कानवडे वय 32 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्रख्यात बिल्डर व्यावसायिक लक्ष्मीकांत उर्फ चेतन अंबादास नाईकवाडी यांच्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात 2 फेब्रुवारी 2021 रोजी गणेश भागुजी कानवडे,मयूर सुभाष कानवडे यांच्यासह अजून एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील गणेश कानवडे या आरोपीस पोलिसांनी अटक केली होती.तर मयूर कानवडे हा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता.त्यास तब्बल 10 महिन्यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी रात्री 10.35 च्या सुमारास संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले.आज बुधवारी मयूर कानवडे यास अकोले न्यायालयात हजर केले असता त्यास आदरणीय न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


मयूर कानवडे याचा संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता.मात्र औरंगाबाद हायकोर्टाने 25 / 06 / 2021 रोजी मयूर कानवडेचा जामीन अर्ज फेटाळला होता.तेव्हापासून अकोले पोलीस त्याच्या शोधात होते.अखेर अकोले पोलिसांनी त्यास सापळा रचून संगमनेर येथून ताब्यात घेतले.


या प्रकरणातील दुसरा आरोपी गणेश भागुजी कानवडे हा जामिनावर बाहेर आहे.प्रख्यात बिल्डर व्यावसायिक चेतन नाईकवाडी यांच्याकडून 25 लाख 75 हजार रुपयांची रक्कम खात्यावर घेण्यात आली होती.तर उर्वरित 4 लाख 25 हजार रुपयांची रक्कम ही रोख स्वरूपात देण्यात आली होती.या घटनेतील आरोपी मयूर कानवडे यास उशिरा का होईना अकोले पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बिल्डर व्यावसायिक चेतन नाईकवाडी यांनी समाधान व्यक्त केले आहे.या घटनेचा तपास एपीआय मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भूषण हांडोरे हे करीत आहे. Attachments area


110 views0 comments