जिल्हा परिषदेच्या साठ शाळांतील आठराशे विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप

अप्रोच संस्थेचा उपक्रम,ज्ञानदीपने साधला समन्वय प्रतिनिधी:- प्रविण धुमाळ

इंदोरी - ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्या शाळा अद्यापही बंद आहेत. तरीही शिक्षण सुरू राहावे यासाठी शाळांतून प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या काळात ग्रामीण भागातील काही मुलांना अभ्यासासाठी लेखन साहित्य उपलब्ध करुन द्यावे या उद्देशाने पुण्याच्या अप्रोच हेल्पिंग हँडस फौंडेशन संस्थेने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर, त्यामध्ये दहा वह्या, शिसपेन्सिल, खोडरबर, पट्टी, पाटी, छोटे डस्टर, चित्रकला वही, रंग, सुईंग कीट, मास्क, सॅनिटायझर वर्षभराच्या स्वयंअध्यनास स्वाध्यायपुस्तिका अशा प्रकारच्या साहित्याने परिपूर्ण स्कूल कीट रुलर इनिशिएटिव्ह फॉर स्कूल एज्युकेशन या प्रकल्पांतर्गत संस्थेने स्कूल किट उपलब्ध करून दिले आहे.

तालुक्यातील तीर्थाचीवाडी, शेरेवाडी, पाडोशी, सावरकुटे, जाधववाडी, पागिरवाडी, नायकवाडी, ठाकरवाडी, सोंगाळवाडी, काठवटवाडी, देवाचीवाडी अशा साठ शाळांतील आठराशे विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किमतीचे स्कूल कीट वाटप करण्यात आले. आवश्यक सर्व साहित्याने परिपूर्ण भरलेलं नव दप्तर पाहून मुले आनंदून गेली होती.

प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील काही शाळांमध्ये स्कूल कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी अप्रोच फाउंडेशनच्या संचालिका मा. पायल मुजुमदार, मा. स्नेहा जाधव, मा.अमोल जाधव, मा. भानुदास आभाळे, मा. गीता रामदासी, मा.विराज संगारे, मा. नंदिनी रामदासी, मा. संदेश मिटकरी, मा. मनिष सोनवणे, मा. भावना रांका, मा. आरती पागे, मा. केतकी जगताप, मा. अनुराग पैठणकर, मा. सुश्रुत पाटणकर, मा. शिशिर जैन, मा. सभ्यता जैन, मा. गणेश वागस्कर, मा.अयाज शेख आदी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. अकोले तालुक्याच्या दुर्गम भागात कोवीडचे नियम पाळून विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप करण्यात आले.


ग्रामीण भागातील सहा ते दहा वयोगटातील मुलांसाठी आमची संस्था काम करते आहे. शाळाबंद असताना मुलांचं शिक्षण सुरू राहावं यासाठी आम्ही गरजू विद्यार्थ्यांना अराईज प्रकल्पांतर्गत स्कूल किटचे वाटप करत आहोत. पायल मुजुमदार, स्नेहा जाधव संचालिका, अप्रोच हेल्पिंग हँडस फौंडेशन पुणे.

शिक्षकांनी अधिक कृतिशील व्हावं, प्रयोगशील व्हावं म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानदीप प्रतिष्ठानने तालुक्यातील गरजू शाळांच्या विद्यार्थ्यांची मागणीअॅप्रोच हेल्पिंग हॅन्ड संस्थेकडे केली होती. वाडीवस्ती वरील शाळांतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना तर मोठ्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना किट उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पिसेवाडी शाळेत झालेल्या वाटप कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी मा. अरविंद कुमावत उपस्थित होते तर वाशेरे येथे झालेल्या कार्यक्रमास पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी मा, जालिंदर खताळ, मा. बाळासाहेब दोरगे, मा. राजेश पावसे उपस्थित होते.

वाटपावेळी झालेल्या कार्यक्रमासाठी गोकूळ नेहे, सतीश वैद्य, अनिल पवार,गणपत सहाणे, भाऊसाहेब हासे, अरुण फरगडे, बाळासाहेब शेळके, राजेंद्र सदगीर, नितिन नेहे, तानाजी वाडेकर, धनंजय गाडेकर, दत्तात्रय शेळके, सुनील गोडसे, गोरक्ष देशमुख, संजय भोर, संजय मुखेकर, ज्ञानदेव फापाळे, सचिन फुलसुंदर, बाळासाहेब बांबळे, नामदेव सोंगाळ, सोमनाथ घोरपडे, अनिल कुटे, राजू थोरात, जयवंत लांडे, सुनील डेरे, नरेंद्र राठोड, बाळासाहेब डेरे, राजू मोहिते,दिपक बोऱ्हाडे, शिवाजी भगत, राजकमल नवले, सुनीता रुपवते, शिल्पा भांगरे, अनुराधा नेहे आदींनी सहकार्य केले.

अकोले तालुक्यातील ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या शिक्षकांशी संपर्क ठेवून असतो. शाळांची मागणी विविध स्वयंसेवी संस्थांकडे पाठवितो. गरजेनुसार शाळांना संगणक, लॅपटॉप, स्कूल किट असे साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असतो. भानुदास आभाळे अक्षरभारती पुणे
182 views0 comments