ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल - मिथुन घुगे

धुमाळवाडी गावची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न


अकोले - अकोले तालुक्यातील धुमाळवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा शांततेत पार पडली.या ग्रामसभेच्या निमित्ताने धुमाळवाडी गावात ग्राम सुरक्षा यंत्रणेचा शुभारंभ अकोले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.प्रथमतः ग्राम सुरक्षा यंत्रणेची डेमोस्ट्रेशन देऊन या यंत्रा संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. श्री घुगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्राम सुरक्षा यंत्रणा ही गावातील नागरिकांना अतिशय उपयुक्त यंत्रणा असून गाव पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची माहिती देणे, गावातील एखाद्या दुःखद घटनेची माहिती, स्वस्त धान्य दुकानाची माहिती, ग्रामपंचायतीच्या सभांचे आयोजन, गावातील चोरी दरोडा किंवा एखाद्या आपद्ग्रस्त घटना अशा विविध बाबींची माहिती एकाच वेळी गावातील नागरिकांना फोनकॉल संदेशाद्वारे मिळू शकते.त्याच बरोबर या यंत्रणेचा फायदा गावातील सुरक्षतेबरोबर पोलीस प्रशासनालाही चांगली मदत होईल.अकोले तालुक्यातील प्रत्येक गावात ही यंत्रणा प्रभावीपणे राबविल्यास गावातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल असे मत घुगे यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रामसभेच्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विषय पत्रिकेवरील सर्व विषय घेऊन महसूल प्रशासनाच्या ई पीक पाहणी या नवीन उपक्रमाची माहिती देऊन शासनाच्या डिजिटल सातबाराचे वितरण कामगार तलाठी प्रवीण ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या "स्री जन्माचे स्वागत" या उपक्रमांतर्गत नवजात बालिकेचा व मातेचा सन्मानपत्र देऊन पोलीस पाटील प्रणाली प्रशांत धुमाळ यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कोरोना कालावधीत मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून याच कालावधीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार सरपंच डॉ रवींद्र गोर्डे, उपसरपंच आशा धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामसेवक श्रीमती खरात यांनी स्वच्छतेविषयी शपथ ग्रामस्थांना दिली. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पुनर्गठन करून समिती स्थापन करण्यात आली.या सभेसाठी ग्रामपंचायत सदस्य कोंडीराम चौधरी, चंद्रकला धुमाळ, विक्रम घोलप, संकेत शेळके, किशोर झोळेकर, अनिता ढगे, उज्वला धुमाळ, वृषाली झोळेकर, ग्रामस्थ कारभारी धुमाळ, गंगाराम धुमाळ, गीताराम झोळेकर, सुरेश धुमाळ, एकनाथ चौधरी, श्रीराम शेटे, रघुनाथ धुमाळ, अण्णासाहेब शेटे, प्रवीण झोळेकर, तुषार झोळेकर आदि ग्रामस्थांनी ग्रामसभेत आपला सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन व आभार प्रशांत धुमाळ यांनी मानले.ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

252 views0 comments