धुमाळ पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने कोव्हिड योध्यांचा सन्मान

आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरणअकोले - क्रांती दिनाचे औचित्य साधुन धुमाळ पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने हुतात्मा स्मारक धुमाळवाडी या ठिकाणी अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते कोरोना महामारीच्या काळात विशेष कामकाज करणाऱ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.डॉ. किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना काळात उत्कृष्ट प्रशासक म्हणून डी. एस बंड धुमाळवाडी,आर एस सांगळे नवलेवाडी, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे, तलाठी प्रवीण ढोले, सरपंच डॉ. रवींद्र गोरडे, उपसरपंच आशा धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य कोंडीराम चौधरी, विक्रम घोलप, संकेत शेळके, किशोर झोळेकर, चंद्रकला धुमाळ, त्रिवेणी भांडकोळी, अनिता ढगे, उज्वला धुमाळ, वृषाली झोळेकर सैनिक पत्नी नीताताई आवारी, माजी सैनिक जिजाबा वाकचौरे, ग्रामसेवक व्ही.सी मुंडे, रोहिणी थोरात, सुनील धुमाळ तुषार झोळेकर आदी मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. डॉ. लहामटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोरोना महामारी हे जागतिक संकट असून जगातील अनेक देशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन मनुष्यहानी ही प्रचंड झालेली आहे. त्या तुलनेत आपल्या देशातील अनेक समाजघटकांनी कोरोना महामारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करून देवदूतासमान कामकाज केलेले आहे. म्हणून मला क्रांती दिनाच्या निमित्ताने या कोरोना योध्यांना सन्मानित करताना विशेष आनंद होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहनही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार लहामटे यांनी केले.कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल धुमाळ पाटील सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत धुमाळ, पोलीस पाटील प्रणाली धुमाळमाजी सैनिक संघटनेचे सल्लागार प्रभाकर जगताप, रामनाथ कासार, अध्यक्ष भास्कर तळेकर,उपाध्यक्ष गोरक्षनाथ वाकचौरे सचिव सुरेश पवार, सहसचिव मनोहर हुलवळे, शांताराम भालेराव, बबन हळकुंडे, विजय धुमाळ, स्वप्नील कांडेकर आदींचे अभिनंदन करून विशेष आभार मानले.


हुतात्मा स्मारक हे अकोले नगरीच्या वैभवात भर टाकणारे वास्तुशिल्प असून त्याचे पावित्र्य राखणे आपणा सर्वांची जबाबदारी असल्याने आमदार निधीतून स्मारक सुशोभीकरणासाठी डॉ. किरण लहामटे यांनी विशेष तरतूद करावी.
मा.श्री.प्रशांत धुमाळ पाटील
अध्यक्ष,स्मारक सुशोभीकरण समिती334 views0 comments