देवठाण येथे स्तनपान सप्ताह उत्साहात संपन्न

अकोले तालुक्यात महिला व बालविकास विभागाचे वतीने प्रत्येक गावातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रात स्तनपान सप्ताहाचे आयोजन करून महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे काम चालू आहे या साठी सरकार अशा विविध सप्ताह चे आयोजन करते त्यात सर्वांनी भाग घ्यावा असे आवाहन महिला बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती आरती गांगुर्डे यांनी केले आहे.

अकोले बालविकास प्रकल्पाचे वतीने देवठाण विभागाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती सोनाली भनगडे यांनी त्यांचे देवठाण गटातील प्रत्येक गावात स्तनपान सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यानुसार देवठाण येथे ही कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्त संपन्न झाला आहे.


याप्रसंगी अंगणवाडी सेविकांनी स्तनपानाचे महत्त्व महिलांना समजावून सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सरला येलमामे ,भागुबाई कातोरे ,संगीता शेळके ,पद्मा पाटोळे ,वंदना जोशी ,शिला शेळके प्रतीक्षा बोडके ,नंदा जोरवर ,विमल खुले ,सुरेखा शेळके, हिरा काळे, चंद्रकला जोरवर,वनिता शेळके कल्पना निरगुडे, शैला हांडे या सेविकांनी सहभाग घेतला.74 views0 comments