प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रदिप नाईकवाडी यांचे पारडे जड !

अकोले - अकोले नगर पंचायतीची मतदान प्रक्रिया अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे.त्यामुळे सर्वच उमेदवार आपला प्रचार करण्यात गुरफटून गेले आहे.प्रभाग क्रमांक 15 मध्ये देखील सर्वच उमेदवारांनी आपली ताकद पुर्णपणे लावली आहे.मात्र विकासकामांच्या जोरावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदिपराज बाळासाहेब नाईकवाडी यांना मतदारांनी पसंदी दिले आहे.त्यामुळे सध्या तरी प्रदिपराज नाईकवाडी यांचे प्रभाग क्रमांक 15 मध्ये पारडे जड दिसत आहे.

प्रभाग क्रमांक 15 मध्ये चौरंगी लढत होत आहे.राष्ट्रवादी पक्षाकडून संतोष नाईकवाडी, भाजपकडून सचिन शेटे,काँग्रेसकडून प्रदिपराज नाईकवाडी तर शिवसेने कडून अजय वर्पे हे निवडणुक रिंगणात उतरले आहे.मात्र शिवसेनेचे उमेदवार अजय वप्रे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळीत राष्ट्रवादीच्या संतोष नाईकवाडी यांना पाठिंबा दर्शविला आहे.या प्रभागात सध्या तीनही उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदारांच्या चरणी लोटांगण घेत आहे.


मात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रभाग क्रमांक 15 मध्ये स्वखर्चाने विकासकामे करणाऱ्या प्रदिपराज नाईकवाडी यांना मतदारांची पहिली पसंती मिळत आहे.प्रदिपराज नाईकवाडी यांनी आपल्या प्रभागातील जिजामाता परिसरात साचत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी मुरुमीकरण केले,शिवनदी परिसरात सपाटीकरण करून स्वच्छता केली,घोलपवस्ती ते धामणगाव रोड रस्त्याची दुरुस्ती केली,या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना अक्षरशः ये जा करता येत नव्हती,प्रभाग क्रमांक 15 मधील वरपे वस्ती ते अभिनव परिसर रस्ता रुंदीकरण व सपाटीकरण करण्यात आले,ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा यासाठी अकोलेतील आयटीआयच्या प्रांगणात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले,तसेच प्रभागातील गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले,कोरोना काळात अकोलेतील सर्वच कोविड सेंटरला शुद्ध पाण्याचे बॉक्स देण्यात आले,कचेरी परिसरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता करण्यात आली,धामणगाव आवारी ते साबळे वस्ती हा 500 मीटरचा रस्ता बनविण्यात आला,राज्यात पडलेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळे रक्तदान शिबीर आयोजित करीत तब्बल 175 रक्तपेशी उपलब्ध करून देण्यात आल्या,अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम प्रदिपराज नाईकवाडी यांनी राबविले आहे.विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम आपल्या खिशाला आर्थिक झळ सोसून स्वतः प्रदिपराज नाईकवाडी यांनी राबविले आहे.त्यामुळे मतदाराराजा प्रदिपराज नाईकवाडी यांना मतांचे भरभरून दान देईल,यात तिळमात्र शंका नाही.


688 views0 comments