2024 साली महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्तेत येईल - नायडू

अकोलेत भाजपा महिला मोर्चाची बैठक संपन्न

अकोले - 2024 साली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येईल अन आघाडी सरकारची बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही,असे प्रतिपादन भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रोहिणीताई नायडू यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उत्तर नगर जिल्हा आयोजित समर्थ बुथ अभियान कार्यकारिणी बैठक अकोले शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानाहून रोहिणीताई नायडू या बोलत होत्या.या बैठकीस भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे,महिला मोर्चा प्रदेश सदस्या सोनाली कुलकर्णी,महिला मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी,संघटक वंदना गोंदकर,कोपरगाव तालुकाध्यक्ष शरदनाना थोरात,अकोले तालुकाध्यक्ष सिताराम पाटील भांगरे आदी पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

रोहिणीताई नायडू पुढे म्हणाल्या की,देशात आपले सरकार असून राज्यात ही आपलेच सरकार स्थापन होणार आहे.त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावा.महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे,यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधींनी अधिकतम लक्ष घालण्याची गरज आहे.बुथ बळकटीकरण करताना पुरुषां बरोबर महिलांचा ही सहभाग दिसून आला पाहिजे,त्यामुळे मोदी सरकारची ध्येय धोरणे आपल्या घराघरा पर्यंत पोहोचवता येतील,असे ही नायडू म्हणाल्या.

प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आपल्या भाषणात म्हणाल्या की,महिलांनी आता चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे.महिलांना आरक्षण असताना देखील खेड्यातील महिला पुढे येण्यास घाबरतात. या महिलांनी न घाबरता समाजात ताट मानाने जगले पाहिजे,असे ही कोल्हे म्हणाल्या.

प्रास्तविकात जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील बुथची आकडेवारी मांडली. तसेच महिलांना राजकारणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू.महिला बचतगटांचे नगर जिल्ह्यात जाळे उभारून महिलांचे खऱ्या अर्थाने सबलीकरण करू,तसेच ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होईल त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरू,असे ही सौ.नाईकवाडी म्हणाल्या.या बैठकीसाठी सुप्रिया धुमाळ,लताताई देशमुख,मंदाताई बराते,पुष्पाताई भांगरे,आरती पठाडे,वैशाली जाधव,वैशाली साळुंखे,वैशाली आढाव,अंजली सोमणी,राजश्री माने,पुष्पाताई वाणी आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

ही बैठक यशस्वी करण्यासाठी उत्तर नगर जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.124 views0 comments