Akole Times Breaking - दिव्यांग व्यक्तीच्या मदतीला धावले कैलासभाऊ वाकचौरे

दिव्यांग बुधा उघडेचे डोक्यावरील ओझं उतरलं खालीअकोले - दिव्यांग व्यक्तीच्या डोक्यावरचे दळण उतरविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सेस फंडातून पिठाची गिरणी देऊन शासकीय योजनेचा जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांनी खरा उपयोग केला.

कळस बु येथील बुधा उघडे व सुनीता उघडे हे दिव्यांग जोडपे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर रहात आहे. पायाने अधू असणारे बुधा ला कायम दळण घेऊन पायी जात असत. त्याचे हे दुःख माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे यांनी जिल्हा परिषदचे सदस्य कैलासराव वाकचौरे यांच्या कानावर घातले. त्यांनी उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे यांना तिचे कागदपत्रे गोळा करण्यास सांगितले. ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गंडाळ यांनी नवीन गिरणी आणून दिली. नवीन गिरणीचे वाटप सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या हस्ते करण्यात आले.


शासकीय योजनेचा उपयोग खऱ्या लाभार्थ्यांना मिळाला तर त्यांचे जीवनात आनंद निर्माण होतो त्यांचे कष्ट कमी होतात अन जीवन सुखकर होते. माणसात देव असतो ते कैलासराव वाकचौरे यांच्यात दिसला. बुधाची तीन, साडेतीन किलोमीटर पायी गावात दळण घेऊन जायचं अन परत तीन,साडेतीन किलोमीटर यायचं अस सहा सात किलोमीटरचा प्रवास शिवाय दिड दोन पायलीचे दळण डोक्यावर, आता त्याच्या डोक्यावरच ओझं उतरल्याचा मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केली.


ReplyForward
979 views0 comments