अकोलेत भाजपाची तिरंगा रॅली संपन्न !

अकोले - भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई चेतनराव नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अकोले शहरातून मोटारसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली.

या रॅलीला भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापासून सुरुवात झाली.भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो,वंदे मातरम,भारत माता की जय,अशा घोषणा देत या रॅलीने अकोले शहराला वळसा घातला.यानंतर ही रॅली कोल्हार घोटी राज्य मार्गावरून पुन्हा भाजप कार्यालयाजवळ दाखल झाली.या रॅलीत अश्विनी नेहे,राजश्री माने,अंजली सोमनी,वैशाली जाधव,मनीषा नाईकवाडी,प्रणाली नवले,स्नेहल धुमाळ,धनंजय संत,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख,तेजस कानवडे,नाजीम शेख,गोविंद झिंजूरडे, शिवाजी उंबरे,अजय खरात,लालू साळवे,महेश झोळेकर आदी सहभागी झाले होते.ही रॅली यशस्वी करण्यासाठी महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी परिश्रम घेतले.

134 views0 comments