प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दोघांत रस्सीखेच !


प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दोघांत रस्सीखेच !

प्रदिपराज नाईकवाडी की विक्रम नवले कुणाला मिळणार उमेदवारी ?


अकोले ;- अकोले नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षीय उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी धडपड सुरू केली आहे.राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस पक्षामध्येच उमेदवारीसाठी प्रदिपराज बाळासाहेब नाईकवाडी व विक्रम मधुकरराव नवले यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


2015 साली ग्रामपंचायत बरखास्त होऊन अकोले नगर पंचायत अस्तित्वात आली.त्यामुळे प्रथम नगरसेवक होण्यासाठी 2015 साली देखील अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.यावेळी राज्यात भाजप शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेत असताना ही अकोलेची नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली होती.माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभवराव पिचड यांचे निर्विवाद वर्चस्व या नगर पंचायतीवर होते.मात्र सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पिचडांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप पक्षाशी सलगी केली.त्यामुळे अकोले तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी पिचडांना त्यांची जागा दाखवित त्यांचा दारुण पराभव केला.त्यामुळे अकोले नगर पंचायतमध्ये सत्तेत असलेल्या पिचडांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी रणनीती आखली आहे.तर नगर पंचायतीची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यूहरचना आखली आहे.त्यामुळे अकोले नगर पंचायतीत कोण बाजी मारणार हे येत्या दिवसात स्पष्ट होईल.मात्र अद्याप एका ही पक्षाने अधिकृतपणे आपले उमेदवार जाहीर न केल्यामुळे राजकिय अंदाज वर्तविणे अशक्य आहे.

2015 साली झालेल्या अकोले नगर पंचायतच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेसच्या तिकिटावर निशिगंधा नाईकवाडी या काँग्रेस पक्षाकडून निवडून गेल्या होत्या.मात्र त्यांच्या कार्यकाळात प्रभागात विकासकामे झाली नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.तसेच प्रभाग क्रमांक 15 चा भावी नगरसेवक म्हणून काँग्रेसचे नेते बाळासाहेब नाईकवाडी यांचे चिरंजीव प्रदिपराज नाईकवाडी यांनी गेल्या दोन वर्षांपासून या प्रभागात सक्रीय राहत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दोन वर्षांच्या कालखंडात प्रदिपराज नाईकवाडी यांनी जिजामाता परिसरात साचत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी मुरुमीकरण केले,शिवनदी परिसरात सपाटीकरण करून स्वच्छता केली,घोलपवस्ती ते धामणगाव रोड रस्त्याची दुरुस्ती केली,या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना अक्षरशः ये जा करता येत नव्हती,

प्रभाग क्रमांक 15 मधील वरपे वस्ती ते अभिनव परिसर रस्ता रुंदीकरण व सपाटीकरण करण्यात आले,ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा यासाठी अकोलेतील आयटीआयच्या प्रांगणात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले,तसेच प्रभागातील गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले,कोरोना काळात अकोलेतील सर्वच कोविड सेंटरला शुद्ध पाण्याचे बॉक्स देण्यात आले,कचेरी परिसरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता करण्यात आली,धामणगाव आवारी ते साबळे वस्ती हा 500 मीटरचा रस्ता बनविण्यात आला,राज्यात पडलेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळे रक्तदान शिबीर आयोजित करीत तब्बल 175 रक्तपेशी उपलब्ध करून देण्यात आल्या,अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम प्रदिपराज नाईकवाडी राबविले आहे.विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम आपल्या खिशाला आर्थिक झळ सोसून स्वतः प्रदिपराज नाईकवाडी यांनी राबविले आहे.या प्रभागाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने संतोष नाईकवाडी यांनी मुलाखत दिली आहे.तर भाजपच्या वतीने स्विकृत नगरसेवक सचिन शेटे यांच्या ही नावाची चर्चा आहे.या प्रभागातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रदिपराज नाईकवाडी व विक्रम नवले यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.त्यामुळे पक्षश्रेष्ठी कुणाच्या गळ्यात काँग्रेस पक्षाची उमेदवारीची माळ टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


926 views1 comment